टीएआयटी २०२२ परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२२ या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी ( दि.२४) प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टीएआयटी २०२२ परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती केली जाणार असून त्यासाठी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२२ या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ( दि.२४) प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२३ ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टीएआयटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा होती. अखेर निकाल जाहीर झाला आहे.