... म्हणून राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ: चंद्रकांत पाटील

राज्यात मुलींचा शैक्षणिक टक्का वाढावा यासाठी गरीब कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार आहे.

... म्हणून राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ: चंद्रकांत पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील मुलींची शिक्षणाची टक्केवारी (Educational percentage of girls) वाढावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने (State Government) आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेलेल्या कुटुंबातील मुलींने शैक्षणिक शुल्क माफ (Educational fee waived) केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. यामुळे गरीब मुलींचा शिक्षणात अडथळा निर्माण करणारा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात मुलांबरोबर आता मुलींची संख्या वाढण्यात मदत होईल, असे मत देखील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. 

 चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राची गंगा घरोघरी पोहचावी यासाठी विद्यमान सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवून अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. याचाच भाग म्हणुन, राज्यात मुलींचा शैक्षणिक टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्रात आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कुटुंबातील मुलींची फी भरण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे. 

सध्या मुलींना शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सूट दिली जात होती. मात्र, आता ही सूट 100 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे आता आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. तसेच, या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार असून मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्याही वाढेल, असा विश्वास वाटतो,असेही त्यांनी म्हटले आहे.