MBBS साठी आता ९ वर्षांचा कालावधी; नॅशनल मेडिकल कमिशनचा नवीन नियम

'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप २०२१' अंतर्गत पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप' पूर्ण केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

MBBS साठी आता ९ वर्षांचा कालावधी; नॅशनल मेडिकल कमिशनचा नवीन नियम
MBBS Education

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या तारखेपासून नऊ वर्षांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असेल. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप' (Rotating Medical Internship) पूर्ण केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

कोणत्याही परिस्थितीत, विद्यार्थ्याला पहिल्या वर्षासाठी (MBBS) चारपेक्षा जास्त वेळा प्रयत्न करता येणार नाही. तर  अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याच्या तारखेपासून नऊ वर्षांनंतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी विद्यार्थ्यांना  दिली जाणार नाही," असा उल्लेख NMC च्या परिपत्रकात आहे. 

अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, कृषी अशा २२ अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया गुरूवारपासून

'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप २०२१' अंतर्गत पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप' पूर्ण केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले  आहे.  याविषयी एज्युवार्ता शी बोलताना शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले म्हणाले, "आधी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा अभ्यासक्रम आणि ३ वेळा रिपीटेशन देण्याची परवानगी होती. पण मध्यंतरी रिपीटेशनची मर्यादा काढून टाकण्यात आली होती. आता पुन्हा विद्यार्थ्यांना ती मर्यादा घालून देण्यात आली आहे. आता वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना  ४ वेळा प्रयत्न करण्याची मुभा देण्यात आली आहे."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo