राजधानीत प्रदूषणाचा कहर; प्राथमिक शाळांना पुढील पाच दिवस टाळे

नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षणमंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया द्वारे माहिती दिली आहे.

राजधानीत प्रदूषणाचा कहर; प्राथमिक शाळांना पुढील पाच दिवस टाळे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या (Pollution in Delhi) पार्श्वभूमीवर राजधानीतील सर्व प्राथमिक शाळा (Primary Schools) आता १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांना ऑनलाईन वर्गाचा पर्याय देण्यात आला आहे. (School Closed)

 

नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षणमंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया द्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'प्रदूषण पातळी उच्च राहिल्याने दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, तर इयत्ता ६वी ते १२वीपर्यंतच्या शाळांना ऑनलाइन क्लासेस घेण्याचा  पर्याय देण्यात आला आहे.' याआधी गुरुवारी राजधानीतील सर्व सरकारी आणि प्राथमिक शाळा दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांची भाषा अन् गणिताची कसोटी; परीक्षेतून समजणार गुणवत्ता, लवकरच अहवाल

 

नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या सर्व शाळा शुक्रवार आणि शनिवारी  बंद राहिल्या. मात्र, या काळात ऑनलाइन वर्ग सुरूच होते. आता रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. अनेक भागात एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी ९०० च्या पुढे गेली आहे.

 

अशोक विहार परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 999 नोंदवला गेला आहे. द्वारका, शाहदरा, जहांगीरपुरी यांसारख्या भागातही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आनंद विहार, पंजाबी बाग, आरकेपुरम, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये प्रदूषणाची पातळी धोकादायकपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. दिल्लीशिवाय नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO