इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल; परीक्षा परिषदेने दिली माहिती

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी ही माहिती दिली. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल; परीक्षा परिषदेने दिली माहिती
Scholarship Examination Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार दि. १० डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, काही प्रशासकीय कारणास्तव आता ही परीक्षा दि. १७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

 

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी ही माहिती दिली. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेचे नियोजन केले जाते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव आता ही परीक्षा दि. १० डिसेंबरऐवजी दि. १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

पानशेतनंतर पुण्यात आणखी चार क्लस्टर शाळा

 योजनेचे उद्दिष्ट व महत्व :-

 

१. योजनेचे उद्दिष्ट :- इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 २. परीक्षेचे स्वरुप :- केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.ई.आर.टी.) यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे.

३. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा एक हजार रुपये (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल. 

 ४. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 ५. इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्याथ्यांना किमान ५५ टक्के गुणांची आवश्यकता आहे.)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j