श्रीमंतांना आरटीईतून प्रवेश देणारी टोळी ;17 पालकांविरूद्ध गुन्हे दाखल 

ऑनलाईन अर्ज करताना काही पालकांकडून आरटीई नियमांना बगल देवून बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर फाॅर्म भरला जातो. मात्र, अशा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक पाउले उचलली जात असून काही पालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

श्रीमंतांना आरटीईतून प्रवेश देणारी टोळी ;17 पालकांविरूद्ध गुन्हे दाखल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

श्रीमंत पालकांच्या मुलांना आरटीईतून प्रवेश (RTE Admission)मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.नागपूर येथील सीताबर्डी (Sitabardi Police, Nagpur) पोलिसांनी तब्बल 17 पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आत्तापर्यंत 3 पालकांना अटक करण्यात आली असून या टोळीचा सूत्रधार शाहिद शरीफ आहे. त्याने श्रीमंत पालकांच्या मुलांना (rich parents children)अपात्र असतानाही नामांकीत शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिल्याचे समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टननुसार नागपूर पोलिसांनी नुकतेच ऑटो डीलचा व्यवसाय करणाऱ्या आणि महिन्याला सुमारे  ४ ते ५ लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या पालकाला अटक केली आहे.त्याला स्वतःच्या मुलाला भवन्स शाळेत प्रवेश मिळवायचा होता. त्यासाठी त्याने शाहिद शरीफ याच्या टोळीतील एकाला हाताशी धरुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र बनावट तयार केले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने मुलाला प्रवेश मिळवला. आरटीई घोटाळा उघडकीस येताच श्यामसुंदर पांडे आणि तारेंद्र पवार यांच्यानंतर मो. जावेद शेख यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासह आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ‘आरटीई’ आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अनेक पालकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शिक्षण विभागाने सुध्दा आरटीईतून बनवाट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही पालकांकडून आरटीई नियमांना बगल देवून बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर अर्ज भरला जातो. मात्र, अशा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक पाउले उचलली जात असून काही पालकांवर कारवाई करण्यात आली आहे.