पी बी जोग शाळा बंद ; आरटीईचे विद्यार्थी वाऱ्यावर, शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली?

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी या विद्यार्थ्यांचे नजिकच्या खाजगी विनाअनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर समायोजित करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर पालक शिक्षण मंडळ तसेच विविध अधिकाऱ्यांकडे चकरा मारत होते. तरीही त्यांना प्रवेश मिळाला नाही.

पी बी जोग शाळा बंद ; आरटीईचे विद्यार्थी वाऱ्यावर, शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मयूर कॉलनी कोथरूड तसेच सिंहगड रोड येथील पी बी जोग प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल (P B Jog Primary English Medium School)दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने बंद करणार असल्याचे शाळा संचालक अमोल जोग (Director Amol Jog)यांनी डिसेंबर २०२३ रोजी सांगितले होते. परंतु, या वर्षीच शाळा बंद करण्यात आल्या असून या शाळेमध्ये आरटीई (RTE)अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि वंचित घटकातील मुलांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह आप पालक युनियनच्या (AAP Parents Union)पदाधिऱ्यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी (Education Commissioner and Primary Education Officer of zp)यांना निवेदन देवून आरटीईच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली.

पुणे शहरामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांची संख्या कमी आहेत. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा कमी आहेत. अशातच आरटीई  मार्फत सीबीएससीचा अभ्यासक्रम शिकलेला मुलांना आता आरटीईतून प्रवेश मिळण्याबाबत अडचणी येत आहेत. या दोन्ही शाळांमधील साधारण 132 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.यासंदर्भात शाळेतील पालकांनी शिक्षण आयुक्त यांना लेखी निवेदन दिले होते. त्यावर 5 मार्च रोजी शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी या विद्यार्थ्यांचे नजिकच्या खाजगी विनाअनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर समायोजित करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर पालक शिक्षण मंडळ तसेच विविध अधिकाऱ्यांकडे चकरा मारत होते. तरीही त्यांना प्रवेश मिळाला नाही.

समायोजन करण्याचे आदेश निघूनही पुढील कार्यवाही झालेली नसल्यामुळे पालकांनी जिल्हा शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेऊन तातडीने इतरत्र इंग्रजी शाळांमध्ये आरटीई मधून च्या कोट्यामधील रिक्त जागांची आकडेवारी जमा करण्याचा आग्रह धरला.सर्वच पालक मध्यमवर्गीय आणि नोकरदार असल्यामुळे रजा घेऊन यासाठी पाठपुरावा करणे अवघड जात असल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा,असाही आग्रह पालकांनी धरला.त्यावर तातडीने यावर्षीच्या रिक्त जागांची आकडेवारी तपासून 23 व 24 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे समायोजन केले जाईल, असे आश्वासन शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहे.

याबाबत आप पाल युनियनाचे मुकुंद किर्दत म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवणे परवडणारे नाही. अचानक शाळा बंद करण्याची पद्धत घातक असून हा शिक्षणाच्या खाजगीकरणाचा मोठा धोका आहे. यामुळे हजारो मुलांना मोठा शैक्षणिक फटका बसतो. गरीब पालकांच्या बाबतीत तरी समस्या अधिकच गंभीर आहे. शिक्षण ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी दर्जेदार आणि सर्व सुविधायुक्त शाळा सरकारने उभ्या करायला हव्यात.

 दारम्यान, यासंदर्भात पी जोग शाळेतील पालक आणि आम आदमी पार्टीचे/आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत, अॅ ड. अमोल काळे आदींनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट देऊन या विषयाचे गांभीर्य त्यांना लक्षात आणून दिले.