शाळेतील असुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी फोडली शिक्षणाधिकाऱ्याची गाडी

आंदोलक विद्यार्थिनींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वाहनावर विटा आणि दगडांनी हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी महिला पोलिस आणि विद्यार्थिनींमध्ये झटापट झाली. 

शाळेतील असुविधांमुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी फोडली शिक्षणाधिकाऱ्याची गाडी
Bihar School Girls Protest

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळेत उपस्थित राहायला बंधनकारक करतात, पण शाळेत ना विद्यार्थनींना (School Girls Protest) बसायला जागा, ना पुरेशा प्रमाणात स्वछता गृह, ना इतर सुविधा. शाळा प्रशासनाच्या या बिघडलेल्या कारभाराचा राग विद्यार्थिनींनी चक्क शिक्षण अधिकाऱ्यावरच (Education Officer) काढला. बिहार राज्यातील संतापलेल्या मुलींनी मंगळवारी शिक्षण अधिकाऱ्याचीच गाडी फोडली. वैशाली जिल्ह्यातील महनार गर्ल्स हायस्कूलच्या (Mahnar Girls Highschool) विद्यार्थिनींनी बीईओ (Block Education Officer) ची गाडीवर हल्ला चढविला.

 

आंदोलक विद्यार्थिनींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वाहनावर विटा आणि दगडांनी हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी महिला पोलिस आणि विद्यार्थिनींमध्ये झटापट झाली. शाळेत २ हजार ८३ विद्यार्थिनी आहेत, मात्र शाळेत बसण्याची जागा केवळ ६०० आहे. आतापर्यंत खूप कमी विद्यार्थिनी शाळेत येत होत्या, मात्र शिक्षण विभागाच्या ७५ टक्के उपस्थितीच्या आदेशामुळे  मंगळवारी  १ हजार २५६  विद्यार्थिनी शाळेत पोहोचल्या होत्या, मात्र त्यांना वर्गात बसण्यासाठी बेंच मिळाले नाहीत. याचा राग आल्याने त्या  रस्त्यावर उतरल्या.

राज्यात ४१८ ‘आयटीआय’मध्ये अभ्यासिका; स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही होणार फायदा

 

महनार गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रस्ता जाम केल्याची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शाळेत पोहोचले होते. येथे विद्यार्थिनींनी त्याच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर एसडीओ नीरज कुमार यांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थिनींना शांत करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. आम्ही शाळेत शिकण्यासाठी येतो तेव्हा येथे बसण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

 

बेंचची व्यवस्था नाही. पुरेसे स्वछतागृह नाही, या परिस्थितीत आपण अभ्यास कसा करणार? असा प्रश्न यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी गटशिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारही केली होती. शेवटी मंगळवारी त्या रस्त्यावर उतरल्या. माहिती मिळताच पोलिसांचे पथकही दाखल झाले. यावेळी  विद्यार्थिनींची महिला पोलिसांशीही झटापट झाली.

 

दरम्यान विद्यार्थ्यांची शाळेत  ७५ टक्के उपस्थिती नसल्याने शासनाने विद्यार्थ्यांना गणवेश योजना, सायकल योजना, शिष्यवृत्ती, फॉर्म यासारख्या सुविधांपासून वंचित ठेवले आहे. तसेच राज्याच्या शिक्षण मंडळाने शाळांच्या काही विशेष सुट्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला होत. यावरून मागील काही दिवसांपासून बराच वाद निर्माण झाला होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j