मणिपूर हिंसाचारात प्रभावित विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांतून शिक्षण नाही : सर्वोच्च न्यायालय

देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मणिपूरमधील २८४ हून अधिक विस्थापित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेतली. विद्यार्थ्यांच्या वकिलांनी देशभरातील इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशाची व्याप्ती वाढवायची मागणी केली होती,

मणिपूर हिंसाचारात प्रभावित विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांतून शिक्षण नाही : सर्वोच्च न्यायालय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मणिपूर हिंसाचारामुळे (manipur violence) प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश दिले आहेत.आता या विद्यार्थ्यांना देशातील  इतर विद्यापीठांमध्ये शिक्षण (education to students in other universities) सुरू ठेवता येणार नाही . भारताचे सरन्यायाधीश डी. वाय.  चंद्रचूड (Chief Justice D.Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने (three judge bench) विद्यार्थ्यांना सिलचर आणि शिलाँगमधील दोन विद्यापीठे निवडून त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यास सांगितले आहे.

या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मणिपूरमधील २८४ हून अधिक विस्थापित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी घेतली. विद्यार्थ्यांच्या वकिलांनी देशभरातील इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशाची व्याप्ती वाढवायची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने हे शक्य नसल्याचे सांगितले. आता या विद्यार्थ्यांना या दोन विद्यापीठांमध्येच शिक्षण घ्यावे लागेल.

न्यायालयाने विद्यार्थ्यांना सांगितले की,  ते आसाम विद्यापीठ, सिलचर किंवा नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी, शिलाँगमध्ये प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय मणिपूर विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरशी त्यांनी संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी व्हायचे आहे.त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

उपलब्ध करून दिलेल्या उपायांवर जे विद्यार्थी समाधानी नाहीत त्यांच्यासाठीही न्यायालयाने वेगळ्या सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या समितीकडेही ते आपली तक्रार करू शकतात. ही समिती राज्यातील मदत, पुनर्वसन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या कामांवर देखरेख करते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मणिपूर हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.