एमपीएससीकडून सहाय्यक प्राध्यापक पदाची मेगा भरती ; ७६५ जागांची जाहिरात प्रसिद्ध 

नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application for Assistant Professor Posts) मागविण्यात आले आहेत. धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा या ठिकाणी नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत.

एमपीएससीकडून सहाय्यक प्राध्यापक पदाची मेगा भरती ; ७६५ जागांची जाहिरात प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission - mpsc ) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण (Medical education) )व औषधी द्रव्य विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical College) तसेच नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application for Assistant Professor Posts) मागविण्यात आले आहेत. धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा (Dharashiv, Alibaug, Sindhudurg, Nandurbar, Parbhani and Satara ) या ठिकाणी नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत.

हेही वाचा : तृतीयपंथीय विद्यार्थ्यांची पूर्ण फी विद्यापीठ भरणार

फॉरेन्सिक मेडिसिन, फिजिओलॉजी, रेडिओ डायग्नोस्टिक/ रेडिओलॉजी , पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओथेरपी, डरमॅटोलॉजी, पीडीयाट्रिक्स, फार्मालॉजी, ऑर्थोपीडीक्स आदी विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना येत्या १२ डिसेंबर पासून १ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक विषयासाठी आरक्षण निहाय उपलब्ध जागा दिलेल्या आहेत. त्यात खेळाडू आरक्षणासह दिव्यांग , अनाथ आरक्षणाचा सुद्धा समावेश आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या संवर्गातील उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२४ पर्यंत चाळीस वर्षे तर मागासवर्गीय संवर्गातील व आरक्षित घटकातील उमेदवारांचे वय ४५ पर्यंत असणे गरजेचे आहे. मुलाखतीची प्रक्रिया, आवश्यकता भासल्यास घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा तपशील आदी माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.