ISRO मध्ये होता येणार यंग सायंटिस्ट ; नववीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी !

सध्या इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेले इच्छुक विद्यार्थी ISRO च्या यंग सायंटिस्ट प्रोग्राम 2024 साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

ISRO मध्ये होता येणार यंग सायंटिस्ट ; नववीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने  'यंग सायंटिस्ट प्रोग्राम'साठी (Young Scientist Program) नोंदणी सुरू केली आहे. इयत्ता नववी  (Class 9th) मध्ये असलेले इच्छुक विद्यार्थी (Interested students) jigyasa.iirs.gov.in/registration या अधिकृत वेबसाइटद्वारे ISRO यंग सायंटिस्ट प्रोग्राम 2024 साठी अर्ज (Application for ISRO Young Scientist Program 2024) करण्यास पात्र आहेत.  ISRO यंग सायंटिस्ट नोंदणी प्रक्रियाची (Registration process) अंतिम तारिख 20 मार्चपर्यंत आहे. 

पहिल्या निवड यादीतील रिक्त जागा किंवा पुष्टी न केल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी ISRO  कडून 4 एप्रिल 2024 रोजी दुसरी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.  निवडलेल्या विद्यार्थ्यांना 12 मे रोजी इस्रो केंद्रांवर अहवाल द्यावा लागेल. यासंदर्भात विद्यार्थ्यांना नोंदणीकृत ईमेलद्वारे माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम 13 ते 24 मे दरम्यान आयोजित केला जाईल. 

असा करा अर्ज.. 

प्रथम इस्रो स्पेस जिग्यासा प्लॅटफॉर्म https://jigyasa.iirs.gov.in/registration वर अर्ज नोंदणी करा. नोंदणीनंतर पाठवलेल्या पडताळणी लिंकवर क्लिक करून तुमचा ईमेल भरा मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यानंतर SpaceQuiz घ्या.वैयक्तिक प्रोफाइल आणि शैक्षणिक तपशील भरा. प्रमाणपत्रांची छायांकित प्रत घ्या, ती मुख्याध्यापक/शाळा प्रमुखांकडून प्रमाणित करून घ्या आणि वेबसाइटवर अपलोड करा.