MBBS चे फुकटात शिक्षण, पण विद्यार्थीच फिरकेनात! ४० लाख रुपये भरून झाले प्रवेश

कर्नाटकातील श्री मधुसुदन साई इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अन्ड रिसर्च असे या महाविद्यालयाचे नाव आहे. याम महाविद्यालयातील मोफत प्रवेश असलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास सध्यातरी एकही विद्यार्थी इच्छूक नसल्याची स्थिती आहे.

MBBS चे फुकटात शिक्षण, पण विद्यार्थीच फिरकेनात! ४० लाख रुपये भरून झाले प्रवेश
MBBS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) दरवर्षीच एमबीबीएस प्रवेशासाठी (MBBS Admission) मोठी चढाओढ असते. लाखो विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करत असताना जागा मात्र काही हजार आहेत. त्यातच खासगी महाविद्यालयांमधील (Private College) शुल्क भरणे अनेकांना शक्य नसल्याने असे विद्यार्थी अनुदानित महाविद्यालयांच्या (Aided College) भरवशावर असतात. पण एखादे महाविद्यालय एमबीबीएलला एक रुपयाही न घेता फुटकात प्रवेश (Free Admission) देत असेल तर? अर्थातच या महाविद्यालयात प्रवेशासाठी उड्या पडतील. पण जरा थांबा. देशातील एका महाविद्यालयात मोफत शिक्षण असूनही एकही प्रवेश झालेला नाही.

कर्नाटकातील श्री मधुसुदन साई इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अन्ड रिसर्च (SMSIMR) असे या महाविद्यालयाचे नाव आहे. याम महाविद्यालयातील मोफत प्रवेश असलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास सध्यातरी एकही विद्यार्थी इच्छूक नसल्याची स्थिती आहे. काही महिन्यांपूर्वीच हे महाविद्यालय सुरू झाले आहे. मोफत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याच संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे काम करावे लागेल, अशी अट प्रवेशावेळी घातली जात असल्याने प्रवेश होत नसल्याचे सांगितले जात आहे.

NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा

द हिंदू या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाविद्यालयाला मंजूर असलेल्या ५० जागांपैकी केवळ ५ टक्के म्हणजे तीन व्यवस्थापन कोट्यातील जागांवर प्रवेश झाले आहेत. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या पहिल्या नीट समुपदेशन फेरीमध्ये सात विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचा पर्याय दिला होता. पण त्यांनी प्रवेश घेण्यास उत्सुकता दाखविली नाही. त्यांनी आता दुसऱ्या फेरीत महाविद्यालया तिसरी पसंती दिली आहे.

महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने शासकीय कोट्यातील ४० टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत स्वतंत्र धोरण तयार करून सरकारला सादरही केले होते. पण स्वतंत्र धोरण करण्याला मान्यता देण्याऐवजी सरकारने संस्थेमध्ये काम करण्यास तयार असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. यावर्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महाविद्यालयाला ५० जागांवर प्रवेशासाठी मंजूरी दिली आहे. त्यापैकी २० जागा शासकीय कोटा, आणि २० जागा खासगी कोट्यातील जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तर उर्वरित सात जागा एनआरआय आणि तीन जागा व्यवस्थापन कोट्यातून प्रत्येकी ४० लाख रुपये प्रति वर्ष शुल्क आकारून भरण्यात येणार आहेत.

परीक्षांचे निकाल लावा, नाहीतर...! विद्यार्थी संघटनेचा MPSC ला निर्वाणीचा इशारा

याविषयी बोलताना कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक एस. रम्या म्हणाल्या, पहिल्या फेरीत सात विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली होती. पण त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता आम्ही या जागा दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाविद्यालयाचे चीफ लायझनिंग ऑफिसर गोविंद रेड्डी यांनी सांगितले की, व्यवस्थापन कोट्यातील पाच टक्के जागा भरल्या आहेत. पण समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या जागांवर प्रवेश घेण्यास उत्सुकता दाखविलेली नाही. दुसऱ्या फेरीनंतर आम्ही प्रवेशाबाबत पुढील निर्णय घेऊ.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j