विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास महागला  ; वाहतूक शुल्काच्या दरात १५ ते २० टक्के वाढ

पालकांच्या डोक्यावरील खर्चाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असताना आता स्कूल बस चालकांकडून शुल्क वाढ केली जाणार आहे. मात्र,सर्व स्कूल बस चालकांनी शाळेच्या वाहतूक समितीमध्ये चर्चा करूनच शुल्क वाढ करावी. शुल्कात अचानक पंधरा ते वीस टक्के वाढ केल्यास पालकांच्या खिशाला पडणार नाही.

विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास महागला  ; वाहतूक शुल्काच्या दरात १५ ते २० टक्के वाढ

 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसू चालकांनी वाहतूक शुल्काच्या दरात १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पालकांना वाढत्या महागाईच्या काळात स्कूल बसच्या शुल्क वाढीचा ही भार सोसावा लागणार आहे. परंतु, पालकांशी चर्चा करूनच ही शुल्कवाढ करावी, अशी पालक संघटनेची मागणी आहे.

महापॅरेंटस असोसिएशनचे दिलीपसिंग विश्वकर्मा म्हणाले, "पालकांच्या डोक्यावरील खर्चाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असताना आता स्कूल बस चालकांकडून शुल्क वाढ केली जाणार आहे. मात्र,सर्व स्कूल बस चालकांनी शाळेच्या वाहतूक समितीमध्ये चर्चा करूनच शुल्क वाढ करावी. शुल्कात अचानक पंधरा ते वीस टक्के वाढ केल्यास पालकांच्या खिशाला पडणार नाही. कोरोना काळात अनेक स्कूलबस चालक देशोधडीला लागले आहेत. वाहनांच्या वाढलेल्या किमती व परिवहन विभागाकडून केल्या करण्यात आलेल्या नियमांमध्ये स्कूलबस चालकांना सुद्धा आर्थिक भार पडणार आहे.हे खरे असले तरी पालकांवर पडणारा शुल्क वाढीचा बोजा कमी करण्यासाठी स्कूलबस चालकांनी सहकार्य करावे."

पुणे बस अँड कार ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे म्हणाले, "पूर्वी १२ ते १३ लाख रुपये असणाऱ्या स्कूल बसची किंमत आता १७ ते १८ लाख रुपये झाली आहे. परिवहन विभागाने स्कूल बसच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत त्यामुळे सिक्युरिटी फीचर वाढल्या आहेत. जीपीएस, रेडियम यासह अनेक गोष्टींवरील खर्चात वाढ झाली आहे. स्कूल बसच्या टायर्ससह इतर स्पेअर पार्ट च्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोनानंतर कशाबशा सुरू झालेल्या स्कूल बस चालवणे वाढत्या महागाईमुळे अवघड होत आहे. त्यामुळे नाईलाजाने स्कूल बस चालकांना शुल्कात वाढ करावी लागत आहे."