खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाणार : आमदार सिध्दार्थ शिरोळे

खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आयोजित रायफल शुटींग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाणार : आमदार सिध्दार्थ शिरोळे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे क्रिडा क्षेत्रात अग्रेसर असून महाविद्यालयाला हॅाकीची मोठी परंपरा  आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू याच महाविद्यालयातून तयार झाले. आता हॅाकीसोबतच विविध खेळांमध्ये हे महाविद्यालय आपली ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाईल, असे मत आमदार सिध्दार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी व्यक्त केले.

 

खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आयोजित रायफल शुटींग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संस्थेचे संचालक, राजेंद्र भुतडा, अनिल मेहता, कमलेश पंगुडवाले, धीरज गुप्ता, सुधीर फेंगसे, ज्ञानेश्वर मुरकुटे,  मोहनलाल जैन, काशिनाथ देवधर, रमेश अवस्थी, प्राचार्य संजय चाकणे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यापीठाचा जलतरण तलाव घोषणे पुरताच; सत्ताधा-यांना आश्वासनांचा विसर

 

कृष्णकुमार गोयल म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी अंग मेहनतीची आवश्यकता असते. म्हणूनच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी क्रिडा क्षेत्रात सहभागी होतो.

 

खडकी शिक्षण संस्थेने या खेळाडूंना नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले. भारताच्या हॅाकी संघाचे नेतृत्व आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j