‘संविधान सन्मान दौड’ मध्ये ५० देशातील विद्यार्थ्यांसह पाच हजार स्पर्धक धावणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स  असोसिएशन यांच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘संविधान सन्मान दौड’ मध्ये ५० देशातील विद्यार्थ्यांसह पाच हजार स्पर्धक धावणार
Constitution Honour Run

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड २०२३’चे (Constitution Honour Run) आयोजन येत्या २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉन मध्ये ५० देशातील विद्यार्थ्यांसह पुणे शहर, जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातील पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स  असोसिएशन यांच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष व ‘संविधान सन्मान दौड’ चे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी दिली. यावेळी डॉ. विजय खरे, डॉ. संध्या नारखेडे, प्रा. विजय बेंगाळे, राहुल डंबाळे, दीपक म्हस्के आदि उपस्थित होते. ‘संविधान सन्मान दौड’च्या टी शर्टचे अनावरण यावेळी करण्यात आले.

पुस्तक प्रेमींसाठी मोठी बातमी; पुण्यात भरणार पहिला राष्ट्रीय पुस्तक महोत्सव

 

वाडेकर म्हणाले, संविधान सन्मान दौड चे यंदा दुसरे वर्ष आहे, मागील वर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे नांव नोंदणीतून दिसते. दौड ची सुरुवात सकाळी साडे पाच वाजता विद्यापीठच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून आहे.  

 

याप्रसंगी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन होणार आहे. यामध्ये स्पर्धक आणि सामान्य नागरिक असे सुमारे १५ हजार जण सहभागी होणार आहेत.  तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अभय छाजेड, राजेश पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

दरम्यान, स्पर्धेच्या निमित्ताने ‘आयर्नमॅन’चा दोन वेळा किताब मिळवणारे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांचा विशेष सन्मान होणार आहे. पुण्यातील पाच आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. विजय खरे म्हणाले, ‘संविधान सन्मान दौड 2023’ साठी विद्यापीठाचे खाशाबा जाधव मैदान सर्व सोई सुविधांसाह सज्ज झाले आहे. स्पर्धेत विद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेंटरच्या मुलांसह विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्न महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

 

'वॉक फॉर संविधान' रॅली 

दौडमध्ये धावू शकणार नाहीत अशा महिला 'वॉक फॉर संविधान' करणार आहेत. या वॉक ची सुरुवात २६ नोव्हेंबर सकाळी आठ वाजता विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. पुढे जाऊन वॉक मधील सहभागी महिला विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि विद्यापीठातीलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर 'वॉक फॉर संविधान' रॅली चा समारोप होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0