आता  CUET परीक्षा होणार हायब्रीड 

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही.

आता  CUET परीक्षा होणार हायब्रीड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) ने  CUET परीक्षा 2024 संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदापासून कॉमन युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजेच, परीक्षा पेन पेपर मोड/ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने घेतली जाईल. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार त्यांना कोणत्या मोडमध्ये परीक्षा द्यायची आहे ते निवडू शकतात. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही.

मीडिया रिपोर्ट नुसार , या वर्षापासून NTA CUET परीक्षा हायब्रीड मोडमध्ये आयोजित करेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे, असे झाल्यास ते फक्त त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसू शकतील. वास्तविक ग्रामीण भागात ऑनलाइन परीक्षेची सुरळीत व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते.

परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. CUET UG परीक्षा 2024 साठी नोंदणी कधी सुरू होईल, याची अचूक तारीख अद्याप NTA ने जाहीर केलेली नाही. त्याचाप्रमाणे मीडिया रिपोर्ट्नुसार 19 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होऊ शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते cuet.samarth.ac.in ही लिंक सक्रिय केल्यानंतर या वेबसाइटवरून फॉर्म भरू शकतात.  CUET UG परीक्षा 15 ते 31 मे 2024 दरम्यान घेतली जाणार आहे.

-------------------------------