शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका एका तासात केवळ 3 तपासाव्या लागणार; CBSE बोर्डाचा निर्णय

CBSE बोर्डाने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला तीन उत्तरपत्रिका तपासतील, या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षकांना  बोर्डाच्या उत्तरपत्रिका एका तासात  केवळ 3  तपासाव्या लागणार; CBSE बोर्डाचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन  (CBSE) च्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दिलेल्या वेळेत तापासणे हा शिक्षकांसाठी बऱ्याच वेळा ताणाचा विषय ठरतो. यामुळे काही वेळा उत्तरपत्रिका तपसताना काही त्रुटी राहून जातात. या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाने काही महत्वपूर्ण बदल (Significant changes) केले आहेत. महत्वाचे विषय फक्त पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) तपासतील, एक शिक्षक दररोज फक्त 20 मुख्य परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत. गुणवत्ता मूल्यमापनासाठी (Quality assessment) शिक्षक दर तासाला तीन उत्तरपत्रिका (Three answer sheets every hour) तपासतील, असा निर्णय सीबीएसईतर्फे घेण्यात आला आहे.  

इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या परीक्षेतील गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पात्रता असलेले पोस्ट ग्रज्युएट टीचर्स ( PGT)  आणि ट्रन्ड ग्रज्युएट टीचर्स  ( TGT)  शिक्षक सहभागी केले जातील. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन पद्धतीचा विस्तार केला आहे. याशिवाय, मूल्यमापनकर्त्याला मदत करण्यासाठी भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयात अध्यापन आणि पात्रता असलेले PGT  नेमण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.

गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी, मुख्य विषयांच्या  २० उत्तर पत्रिका आणि उर्वरित विषयांमध्ये २५ उत्तर पात्रिकांचे  प्रतिदिन मूल्यमापन केले जाईल.  शिवाय बोर्डाने मूल्यांकन कर्त्यासोबत एक सहाय्यक ठेवला आहे, जो मूल्यमापनानंतर सर्व प्रश्नांची बेरीज आणि मूल्यमापन बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी उत्तरपत्रिका तपासेल. 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन शाळा प्रमुखांना मूल्यमापन करण्यास सक्षम असलेल्या शिक्षकांची नावे आणि माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मूल्यमापन केंद्रावर रविवार वगळता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूल्यांकनाचे काम केले जाणार आहे. ही ८ तासांची वेळ पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांना मूल्यांकन केंद्र सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे गुणपत्रिकामध्ये होणारे गोंधळ कमी होणार आहेत.