Chandrayaan-3 Landing : इस्त्रो सज्ज, शेवटची २० मिनिटे धडधड वाढविणारी
रशियाची मोहिम अयशस्वी ठरल्याने चंद्रयान-२ या मोहिमेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २०१९ मध्ये भारताचे चंद्रयान-२ चंद्रावर उतरण्यापुर्वीच क्रॅश झाले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतासाठी (India) आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) चंद्रयान-३ चे (Chandrayaan 3) विक्रम लँडर (Vikram Lander) आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. त्यासाठी इस्त्रो सज्ज झाले असून देशवासियांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. पण या मोहिमेतील शेवटची जवळपास २० सेकंद श्वास रोखून धरायला लावणारी आहे. हा मोहिमेत सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
रशियाची मोहिम अयशस्वी ठरल्याने चंद्रयान-२ या मोहिमेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २०१९ मध्ये भारताचे चंद्रयान-२ चंद्रावर उतरण्यापुर्वीच क्रॅश झाले होते. त्यामुळेच चंद्रयान-३ साठीही शेवटचा टप्पा महत्वाचा मानला जात असून त्यासाठी इस्त्रोने प्लॅन बी तयार ठेवला आहे. लँडिंगसाठी योग्य परिस्थिती नसल्यास किंवा तांत्रिक अडथळे आल्यास लँडिंग चार दिवस पुढे ढकलले जाणार आहे.
शेवटच्या वीस मिनिटांत काय होणार?
चंद्रयान ३ बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर लँडिंग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला ५ वाजून ४४ मिनिटांनी सुरूवात होण्याची शक्यता इस्त्रोने व्यक्त केली आहे. त्यानंतरची पुढची २० मिनिटे लँडिंगसाठी प्रयत्न केले जातील. यातील प्रत्येक सेंकद इस्त्रोसाठी महत्वाचा आहे. लँडिंगसाठी सज्ज झाल्यानंतर तशी कमांड प्राप्त होताच लँडर विक्रम २५ किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाण्यास सुरुवात करेल. त्यानंतर दर सेकंदाला लँडरचा वेग कमी केला जाईल. शेवटच्या तीन मिनिटांत लँडर पृष्ठभागापासून १५० मीटर वर असेल आणि त्याचा वेग ६० मीटर/सेकंद असेल.च
चंद्रयान मोहिमेविषयी व्हिडीओ - https://www.youtube.com/shorts/41xdbN_p_TY
ही प्रक्रिया सुरू असतानाच विक्रमचा कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेईल. त्याठिकाणची स्थिती लँडिंगसाठी ठीक नसल्यास १५० मीटर पुढे पृष्ठभागाची छायाचित्रे घेऊन तिथे लँडिंग केले जाईल. पहिल्याच प्रयत्नात सर्वकाही ठीक असल्यास एक ते दीड मिनिटांत सॉफ्ट लँडिंग होईल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत जिकिरीची असून प्रत्येक घटनेकडे शास्त्रज्ञांचे बारकाईने लक्ष असेल.
प्लॅन बी तयार
चंद्रयान-३’चे लँडिंगमध्ये काही अडचणी आल्यास वेळ बदण्यात येऊ शकते, अशी माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी दिली आहे. चंद्रपृष्ठावर यान उतरण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाईल. मात्र, सध्या तरी सर्व यंत्रणा तसेच स्थिती ठीक असून आता इस्त्रोकडून अपेक्षित सर्व घटना घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com