MBBS : अजूनही परदेशातील विद्यापीठांकडे ओढा का?

मागच्या वर्षी म्हणजेच २०२२ साली घोषित केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सरकारी आणि खाजगी अशा एकूण ५४२ महाविद्यालयनमधून ७९ हजार ८५७  इतक्या जागा निघाल्या होत्या.

MBBS : अजूनही परदेशातील विद्यापीठांकडे ओढा का?
MBBS Education

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सर्वसाधारणपणे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय (Medical Education) क्षेत्राकडे अधिक असतो. त्यातही वैद्यकीय म्हणजेच MBBS ला प्रतिष्ठित समजले जाते. त्यामुळे युवकांचा कल या क्षेत्राकडे जास्त असतो. मात्र देशभरात MBBS च्या उपलब्ध जागा आणि NEET उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात खूप तफावत आहे. त्यामुळे आता वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी विद्यापीठे पहिली पसंती ठरत आहे. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा http://eduvarta.com/

MCI (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ) ने मागच्या वर्षी म्हणजेच २०२२ साली घोषित केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सरकारी आणि खाजगी अशा एकूण ५४२ महाविद्यालयनमधून ७९ हजार ८५७  इतक्या जागा निघाल्या होत्या. तर NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १८ लाखाच्या घरात होती. एवढ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना इतक्या कमी जागेमध्ये सामावून घेणे शक्य नाही आणि म्हणूनच नीट चा कट ऑफ खूप जास्त जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणे शक्य होत नाही.  अॅडमिशन घेणे शक्य होत नाही ते विद्यार्थी मधला मार्ग म्हणून परदेशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. 

आरक्षित प्रवर्गाच्या जागांसाठी हल्ली मोठी स्पर्धा असते. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थी खुल्या वर्गातून प्रवेश घेतात. तर समांतर आरक्षणाच्या धोरणानुसार आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवरही प्रवेश दिला जातो. परिणामी खुल्या वर्गातील ४८ टक्के जागांवर सर्व इच्छुकांना प्रवेश मिळणे अशक्य असल्याने शेवटी असे विद्यार्थी युक्रेन, बांगलादेश, रशिया, चीन अशा कमी खर्च असणाऱ्या देशांची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड करतात.

भारताच्या तुलनेत युक्रेन, रशियातून कमी खर्चामध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना भारतातही वैद्यकीय सेवा देता येते. भारतात वैद्यकीय सेवेचा परवाना मिळवण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पात्रता परीक्षा घेतली जाते. ही उत्तीर्ण केल्यावर भारतात सेवा देता येते. याशिवाय परदेशातून पदवी घेतल्याने अशा डॉक्टरांना रुग्ण अधिक पसंत करत असल्याने वैद्यकीय सेवेत परदेशी शिक्षणाची अशी दुहेरी मदत होते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाकडे तरुणाचा ओढा वाढत असला तरी याचे काही दुष्परिणामही आहेत. ‘डिपर’चे संस्थापक आणि स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ हरीश बुटले (Harish Butle) यांनी याविषयी 'एज्युवार्ता' सोबत बोलताना याविषयावर अधिक प्रकाश टाकला. बुटले म्हणाले, "सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना NEET मध्ये किमान ५६० गुण संपादन करावे लागतात. तर खाजगी विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान ५१० गुण लागतात. तर दुसरीकडे अभिमत विद्यापीठांमध्ये ४७५ गुण लागतात.’’

‘जे विद्यार्थी या निकषावर खरे उतरत नाहीत आणि जे पैसे खर्च करू शकतात, ते परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. यामध्येही एक अडचण आहे. जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण घेऊन पुन्हा भारतात येतात त्यांना इथे प्रॅक्टिस करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत फक्त १० ते १५ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात. इतर विद्यार्थ्यांचे मार्ग पुन्हा बंद पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील इतर पर्यायाबद्दल विचार करण्याची गरज आहे," असेही बुटले यांनी सांगितले.