स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सर्व परीक्षांसाठी आता नवीन वेबसाइट 

 सर्व उमेदवारांना विविध परीक्षांसाठी तयार करावा लागेल नवीन  OTR 

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सर्व परीक्षांसाठी आता नवीन वेबसाइट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission-SSC ) च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे.  केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये विविध पात्रता (10वी, 12वी, पदवीधर आणि इतर) पदांवर थेट भरतीसाठी SSC द्वारे घेतलेल्या सर्व परीक्षांसाठी उमेदवार आता नवीन वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. SSC च्या सर्व परीक्षांसाठी आता www.ssc.gov.in ही नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. 

सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना आता नवीन वेबसाईटवर नोंदणी करून  एक वेळ-नोंदणी ( OTR)  करावी लागेल. आयोगाने  जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व उमेदवारांना विविध परीक्षांसाठी नवीन OTR तयार करावा लागेल. OTR केल्यानंतर उमेदवारांना  प्रत्येक वेळी विविध परीक्षांसाठी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार नाही.

ज्या उमेदवारांनी जुन्या वेबसाइटवर ओटीआर तयार केला आहे. त्यांनाही नवीन वेबसाइटवर नवीन नोंदणी करावी लागेल.परंतु, या नोंदणीसाठी कोणतीही कालमर्यादा SSC ने जाहीर केलेली नाही. 

अशी करता येईल नोंदणी

* परीक्षांमध्ये बसण्यासाठी उमेदवारांना एसएससीच्या नवीन वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
* मुख्यपृष्ठावर दिलेल्या 'लॉग इन/नोंदणी' लिंकवर क्लिक करा. 
* नोंदणी करा लिंकवर क्लिक करा.  यानंतर उमेदवार ओटीआर पेजवर पोहोचू शकतील. 
* येथे दिलेल्या सूचनांचे पालन करून उमेदवार स्वतःची नोंदणी करू शकतील.