नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 3 री आणि 6 वी ला मिळणार नवीन पाठ्यपुस्तके

इयत्ता 3 री च्या पाठ्यपुस्तकांचे काम अंतिम टप्यात असून सध्या पुस्तकांचे संपादन आणि प्रूफरिडींग सुरु आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 3 री आणि 6 वी ला मिळणार नवीन पाठ्यपुस्तके

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) नवीन पाठ्यपुस्तके (New textbooks) सादर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हा बदल फक्त इयत्ता 3 री आणि  6 वी च्या पुस्तकांसाठीच मर्यादीत असणार  आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, NCERT  आगामी शैक्षणिक वर्षासाठी (for the upcoming academic year) इयत्ता 3 आणि 6 साठी (Class 3 and 6) नवीन पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करण्यास प्राधान्य देत आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या (National Education Policy 2020) अनुषंगाने इयत्ता 1 आणि 2 ची पाठ्यपुस्तके आधीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
 
इंग्रजी, हिंदी, उर्दू, गणित आणि पर्यावरण अभ्यास (EVS) सारख्या विषयांचा समावेश असलेल्या इयत्ता 3 री च्या पाठ्यपुस्तकांचे काम अंतिम टप्यात असून सध्या पुस्तकांचे संपादन आणि प्रूफरिडींग सुरु आहे. त्याचप्रमाणे गणित, विज्ञान आणि भाषा या विषयांच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकांचा मसुदाही अंतिम टप्प्यात आहे. पाठ्यपुस्तक वेळेवर तयार व्हावे, यासाठी प्रकाशकांना कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रकाशन आणि वितरणासाठी मार्चची अंतिम मुदत दिल्याने प्रूफरीडिंग प्रक्रियेला गती देण्यासाठी 2-3 दिवसांत पुनरावलोकन करण्याचे काम संपादकांना देण्यात आले आहे. दरम्यान 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 3 री  आणि 6 वी व्यतिरिक्त इतर सर्व इयत्तांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.