अभ्यासू विद्यार्थ्यांचा नोकरीसाठी लढा, बीडमध्ये पेपर फुटीचा पाढा
बीड जिल्ह्यात पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात नेहमीच चर्चेत राहाणाऱ्या बीड जिल्ह्यात (Beed district) झालेल्या पेपरफुटीमुळे (paper leak) पुन्हा एकादा खळबळ उडाली आहे. पुरवठा निरीक्षक पदाचा (Supply Inspector Post) पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला असून ही (Beed paper leak) बातमी महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी फिरत आहे. पेपर फोडल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मात्र, पाणी फिरले आहे.
आरोग्य भरती असो की, पोलीस भरती किंवा आणखीन कुठलीही परीक्षा झाली आणि बीड जिल्हा चर्चेत आला नाही असे कधी झालेच नाही. आाता निमित्त ठरले आहे ते पुरवठा निरीक्षक पदाच्या पेपर फुटीचे, यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बीड येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र येथे काही परीक्षार्थी गैरप्रकार करताना दिसून आले. यावेळी परीक्षार्थींकडून काही इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ब्लूटूथ आणि वॉकीटॉकीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा समन्वय संतीने याबाबत एक्स या सोशल मिडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, पकडण्यात आलेला आरोपी नाव लहू मच्छिंद्र काळे असून (रा. बक्करवाडी ता. बीड) येथिल रहिवासी आहे. विशेष म्हणजे तो पेपर फुटी प्रकरणातील सराईत आरोपी आहे. या आधी देखील काही पेपर फुटी प्रकरणांध्ये त्याचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर यते आहे. कोतवाल भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती या पेपर फुटी करणाऱ्या आरोपीमध्ये देखील लहू काळे याचे नाव असल्याचे तापासात निपन्न झाले आहे.
eduvarta@gmail.com