विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सवित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी ( दि. १० ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सवित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी ( दि. १० ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी विद्यापीठाच्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ विजय खरे,वित्त व लेखा अधिकारी सीए चारुशीला गायके, इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ.संजय ढोले, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. पंडित राधाकृष्ण ,आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.विलास आढाव , सुनील धिवार यांच्यासह अधिसभा सदस्य, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

----