राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण परीक्षेचा निकाल जाहीर

ही परीक्षा १६, १७, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने ८ सत्रांमध्ये घेण्यात आली होती, असे  NTA ने पत्रकात म्हटले आहे.  

राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण परीक्षेचा निकाल जाहीर
NITTT Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने  राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण परीक्षेचा (NITTT) निकाल केला आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार nittt.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन NITTT सप्टेंबर २०२३ परीक्षेचा निकाल पाहू शकतात. NTA ने निवडलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक जारी केले आहे. ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरावे  लागेल.

 

NTA ची जबाबदारी फक्त परीक्षा आयोजित करणे, प्रक्रिया करणे आणि निकाल जाहीर करणे ही होती. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग (NITTTE) द्वारे योग्य वेळेत मॉड्यूल पूर्णता प्रमाणपत्र जारी केले जाईल. ही परीक्षा १६, १७, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने ८ सत्रांमध्ये घेण्यात आली होती, असे  NTA ने पत्रकात म्हटले आहे.

विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांचे 'पीआरएन' ब्लॉक ; काय आहे नेमके कारण ?

 

असा पाहा निकाल -

* निकाल पाहण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजेच nittt.ac.in ला भेट द्या 

* “NITTT सप्टेंबर २०२३ स्कोअर कार्ड डाउनलोड करा” या लिंक वर क्लिक करा 

* उघडलेल्या पृष्ठावर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखे तपशील प्रविष्ट करा.  सबमिट बटन दाबा.

* तुमचे निकाल संगणकाच्या स्क्रीनवर दिसतील.

* निकाल तपासा, डाउनलोड करा आणि  प्रिंटआऊट घ्या.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k