विद्यापीठ आवारात राडा; गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने तरुणाला जबर मारहाण

विद्यापीठाच्या सेवक वसाहतीत रविवारी रात्री ही घटना घडली असून चतु:शृंगी पोलिसांनी दिनेश वाल्मिकी, प्रतिक मल्हारी, उमेश या तिघांवर गुन्हा दाखल आला आहे.

विद्यापीठ आवारात राडा; गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने तरुणाला जबर मारहाण
SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठाच्या आवारात गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) वर्गणी न दिल्याने एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा तरूण गंभीर जखमी झाला असून  याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा किशोर तांबोळी (वय ३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

विद्यापीठाच्या सेवक वसाहतीत रविवारी रात्री ही घटना घडली असून चतु:शृंगी पोलिसांनी दिनेश वाल्मिकी (वय ३०), प्रतिक मल्हारी (वय २३, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय २५, रा. चिखलवाडी, ओैंध) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा तांबोळी याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना चारचाकीने उडविले; दोघांचा मृत्यू, बारामतीजवळील घटना

तांबोळीसह वाल्मिकी आणि मल्हारी हे तिघेही विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीमध्ये राहतात. वसाहतीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी तरुणांकडून वर्गणी गोळा केली जात आहे. वाल्मिकी आणि मल्हारी या दोघांनी तांबोळी यांच्याकडे वर्गणी मागितली होती. पण त्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने वाद झाला. 

वसाहतीतील एका मंडळाला वर्गणी दिली असल्याने आता वर्गणी देणार नसल्याचे तांबोळी याने सांगितले. त्यावरून वाद वाढत गेला आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. तिन्ही आरोपींनी तांबोळीला बांबूने मारहाण केली. या मारहाणीत तांबोळी जखमी झाला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तांबोळीने तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j