JNU: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एवढी मोठी भिंत का उभारणार ?

१०० फूट भारतीय ध्वजही लावण्यात येणार

JNU: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एवढी मोठी भिंत का उभारणार ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) स्वातंत्र्यसैनिकांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या आवारात एक भिंत (wall in the university premises) बांधण्यात येत असून त्यावर एक हजाराहून अधिक स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहिली जाणार आहेत. शिवाय त्यावर १०० फूट भारतीय ध्वज (100 feet Indian flag) लावण्यात येणार असून भारतमातेचा पुतळाही उभारण्यात येणार आहे.  

चरक फाउंडेशनतर्फे ही भिंत बांधण्यात येत आहे. तरुणांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने ही भिंत बांधली जात आहे.  जेएनयू कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेर ही भिंत बांधली जात आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे नाव असलेल्या या भिंतीचे उद्घाटन फेब्रुवारी २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे.  
या भिंतीच्या प्रत्येक बाजूला राष्ट्र चिन्हाचा स्तंभ असेल. त्याची उंची दहा फूट आणि लांबी ६० फूट असेल. या भिंतीवर स्वातंत्र्यसैनिकांची नावे, त्यांचा कार्यकाल, त्यांच्या  राज्याचे नाव, अशी सर्व माहिती दिली जाणार आहे. त्याचाप्रमाणे त्यावर एक क्यूआर कोडही असेल, तो स्कॅन केल्यावर स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित सर्व कथा वाचता आणि ऐकता येतील. शालेय मुलांना दाखवण्यासाठी दर महिन्याला ही भिंत पाहण्यासाठी उपलब्ध असेल.