NEET च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी 

एनटीएकडून ११ ते १३ एप्रिल या कालावधीत अर्ज करता येतील, असे स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे संकेतस्थळावरून अर्ज भरता आले नाहीत.

NEET च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी 
NEET UG 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने या आधी जाहीर केल्यानुसार  काल म्हणजेच ११ एप्रिल रोजी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट  (NEET) ची लिंक नावनोंदणीसाठी पुन्हा सुरु होणार होती. पण असे न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये (Students) संभ्रम निर्माण झाला होता. आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार ही लिंक आज संध्याकाळपासून सुरु होण्याची शक्यता आहे. (NEET UG 2023 Latest News)

कालच्या प्रकारानंतर NEET UG 2023 साठी इच्छुक असलेले विद्यार्थी सोशल मीडियावर तक्रार करत होते. दरम्यान NTA ने म्हटले आहे की, विद्यार्थी आज संध्याकाळपासून नाव नोंदणी करू शकतील. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार "डेटा जास्त असल्यामुळे तो गोळा करून अपलोड करायला वेळ लागत आहे. सध्या ती प्रक्रिया सुरु असून आज संध्याकाळपर्यंत लिंक ओपन होईल," असे आश्वासन NTA कडून देण्यात आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

अनेक विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यानुसार एनटीएकडून ११ ते १३ एप्रिल या कालावधीत अर्ज करता येतील, असे स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे संकेतस्थळावरून अर्ज भरता आले नाहीत. बुधवारी दुपारपर्यंत हीच स्थिती कायम होती. आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी खूप कमी कालावधी उरला आहे. येत्या सात मे रोजी ही परीक्षा होणार आहे.