NEET UG 2024 : परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार 

निकाल जाहीर झाल्यानंतर, NTA ची अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET-UG वर पाहता येणार आहे.  

NEET UG 2024 : परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 14 जून रोजी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET UG 2024) चा निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर (NEET UG 2024 Results announced) झाल्यानंतर, NTA ची अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET-UG वर पाहता येणार आहे.  

NEET UG साठी अर्ज प्रक्रिया 09 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली . 5 मे 2024 रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आता परीक्षेचा निकाल 14 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 14 जून रोजी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET UG) 2024 चा निकाल जाहीर करणार आहे. निकालाची तारीख अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात नमूद केली होती.  NTA निकालांसोबत कट-ऑफ गुण जाहिर करेल. विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल तपासताना NEET प्रवेशपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. 

NEET UG 2024 परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली. त्यासाठी 24 लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. याची उत्तर की 29 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. वैद्यकीय अर्जदारांना तात्पुरत्या NEET UG उत्तर कीवर आक्षेप नोंदवण्यासाठी 31 मे पर्यंत परवानगी देण्यात आली. मागील वर्षी, सर्वसाधारण श्रेणीचा NEET UG कट ऑफ  MBBS आणि BDS विद्यार्थ्यांसाठी 50 आणि OBC, SC आणि ST अर्जदारांसाठी 40 एवढा होता.