महावितरणमध्ये 5347 जागांसाठी भरतीला सुरुवात

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/ वर अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 

महावितरणमध्ये 5347 जागांसाठी भरतीला सुरुवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्ही नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण महावितरण कंपनीमध्ये (Mahavitaran Company) विद्युत सहायक (Electrical Assistant) पदांच्या एकूण 5 हजार 347 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरु झाली आहे. यामध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/ वर अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 

महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. “विद्युत सहायक” पदांच्या एकूण 5 हजार 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार असून ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेत एकुण 5 हजार 347 जागा आहेत. वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST तर  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST असे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी,असे आवाहन करण्यात आले आहे.