NEET MDS परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध

या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. 

NEET MDS परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET MDS परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध (Admit card released) करण्यात आले आहेत. नॅशन बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने अधिकृत वेबसाइट https://natboard.edu.in वर मास्टर ऑफ डेंटल सर्जरी NEET परीक्षेसाठी (National Eligibility cum Entrance Test) हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. 

NEET MDS परीक्षा 2024 ही 18 मार्च 2024 रोजी होणार आहे. परीक्षेनंतर तात्पुरती उत्तर सूची जाहीर केली जाईल. यानंतर उमेदवारांना आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी विहित शुल्क भरावे लागेल, त्यानंतरच हरकती स्वीकारल्या जातील. यानंतर अंतिम उत्तर सूची आणि निकाल जाहीर केला जाईल. परीक्षेचा निकाल 18 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध होईल.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने काल झालेल्या सुनावणीत  NEET MDS परीक्षेच्या तारखेत बदल करण्यास  नकार दिला आहे. इंटर्नशिपची कट-ऑफ तारीख 31 मार्च ऐवजी 30 जून करण्यात आली आहे.

अनेक विद्यार्थ्यांच्या मते, विविध राज्यांतील प्रशिक्षणार्थींना कोविड-19 मुळे प्रशिक्षणात 7-9 महिन्यांचा खंड पडला होता. आणि म्हणूनच त्यांची इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या तारखा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सध्याच्या परीक्षेचे पात्रता निकष ३१ मार्च ठरवले आहेत ,जे विद्यार्थ्यांच्या मते अन्यायकारक आहे. याचिकर्त्यांच्या एका गटाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला NEET-MDS 2024 परीक्षा जुलैमध्ये घेण्याची विनंती केली होती.

असे डाऊनलोड करा प्रवेश पत्र

NEET MDS 2024 हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स जसे की यूजर आयडी आणि पासवर्ड एंटर करणे आवश्यक आहे. यानंतर ॲडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.