MAH नर्सिंग CET 2024 साठी नोंदणी करण्यास पुन्हा एकदा 'या' तारखेपर्यंत  मुदतवाढ

इच्छुक उमेदवार ३१ मार्चपर्यंत mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

MAH नर्सिंग CET 2024 साठी नोंदणी करण्यास पुन्हा एकदा 'या' तारखेपर्यंत  मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test ) कक्षातर्फे  MAH नर्सिंग CET 2024 (MAH Nursing CET 2024) साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख (Last Date) पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांना MAH नर्सिंगला अॅडमिशन घेयचे आहे आणि ज्या उमेदवारांनी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षासाठी अद्याप अर्ज भरला नाही, त्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार ३१ मार्चपर्यंत mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

MH-Nursing CET 2024 साठी नोंदणी करण्यास येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही विद्यार्थी आणि पालकांकडून  मुदतवाढीबाबत  सीईटी सेलला पत्र प्राप्त झाले. त्यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नोंदणीची तारीख वाढवण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. हे लक्षात घेऊन राज्य सीईटी सेलने एमएच-नर्सिंग सीईटी-2024 च्या ऑनलाइन नोंदणीची तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिसरी आणि शेवटची मुदतवाढ असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही, त्यामुळे इच्छूक उमेदवारांसाठी नोंदणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. 

इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) वगळता महाराष्ट्र राज्यातील एखाद्या संस्थेतून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी पुनर्नोंदणी 1 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज  करू शकतात. 

असा करा नोंदणी अर्ज

प्रथम MAHACET च्या अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नर्सिंग सीईटी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन पृष्ठावर स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी जमा करा. फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.