'प्लॅन ए' फसला तरी उमेश घाडगे मागे हटले नाहीत; MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करत बनले यशस्वी उद्योजक

आज पुण्यात घाडगे यांच्या चार अभ्यासिका आणि पाच हॉस्टेल्स आहेत. यामधून सुमारे दोन हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.

'प्लॅन ए' फसला तरी उमेश घाडगे मागे हटले नाहीत; MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करत बनले यशस्वी उद्योजक
Umesh Ghadge

दीपा पिल्ले पुष्पकांथन

स्पर्धा परीक्षेसाठी (Competitive Examination) ५ वर्ष प्रयत्न करूनही उमेश घाडगे (Umesh Ghadge) यांना यश मिळाले नाही. मग पुढे काय? असा विचार करून आपल्यासारखेच खेड्यापाड्यातून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात (Pune) येणाऱ्या मुलांची मदत करायची, या उद्देशाने माफक दरात अभ्यासिका आणि हॉस्टेल सुरु केले. पुण्यासारख्या शहरात जोखीम पत्करू सुरू झालेल्या व्यवसायाने उमेश घाडगे यांना एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख मिळवून दिली.

'स्टडी ग्रुप' चे संचालक उमेश घाडगे यांनी अपयशाला कवटाळून न बसता आयुष्याची दिशा बदलली. आपल्या या प्रवासाबद्दल घाडगे यांनी 'एज्युवार्ता'शी संवाद साधला. घाडगे म्हणाले, "मी खूप आशेने स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून पुण्यात आलो. पाच वर्ष प्रामाणिक प्रयत्नही केले. पण यश मिळाले नाही. यामुळे माझ्या आयुष्यातील महत्वाची वर्ष वाया गेली. मला आणखीन वर्ष वाया घालवणे शक्य नव्हते. म्हणून दुसरा पर्याय शोधत होतो. दरम्यान खेड्यापाड्यातून स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात येणाऱ्या मुलांची कष्ट जवळून पाहत होतो, अनुभवत होतो. या मुलांजवळ अभ्यासिका किंवा हॉस्टेलसाठी पुरेसे  पैसे नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागते, हे अनुभवले होते. मग अशा मुलांसाठी काहीतरी करायचे ठरवले. त्यातूनच अभ्यासिका आणि हॉस्टेल सुरु करण्याचे ठरवले.''

Pune News : स्पर्धा परीक्षेत अपयश आले अन् वेळीच बदलला ट्रॅक; 'प्लॅन बी'मुळे योगेश बनला उद्योजक

आज पुण्यात घाडगे यांच्या चार अभ्यासिका आणि पाच हॉस्टेल्स आहेत. यामधून सुमारे दोन हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. "स्पर्धा परीक्षा देणारे बरेच विद्यार्थी खेडेगावातून आलेले असतात. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. या गोष्टी लक्षात घेऊन मी आवश्यक सोईसुविधांनी सज्ज तरी माफक दरात अभ्यासिका आणि हॉस्टेल्स सुरु केले. त्यामुळे माझ्या अभ्यासिका आणि हॉस्टेलकडे मुलांचा ओघ वाढला. मला कमी काळात चांगले यश मिळाले," असे घाडगे यांनी सांगितले.

भरतीतील पेपरफुटी : या पाच उपाययोजना टोळ्यांना करतील हद्दपार; समन्वय समितीचे सचिवांना पत्र

"ज्या अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांनी पुर्व परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि पैशांच्या अभावी त्यांना मुख्य परीक्षा देता येत नसेल, अशा विद्यार्थ्यांना आमच्याकडे मोफत प्रवेश दिला जातो. शिवाय ज्या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांना कमवा शिका योजनेअंतर्गत आमच्याच संस्थेत नोकरी देतो. अशा पद्धतीने परीक्षा देऊन आमच्याकडचे विद्यार्थी तलाठी, पीएसआय, एसआय, एएसओ अशा विविध पदांवर कार्यरत आहेत," असे घाडगे हे अभिमानाने सांगत होते. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo