NCL चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांचा डी.एम. त्रिवेदी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

ICC ही भारतीय रासायनिक उद्योगाची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. डॉ. अमोल कुलकर्णी 2005 पासून CSIR-NCL च्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात कार्यरत आहेत.

NCL चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांचा डी.एम. त्रिवेदी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (CSIR-NCL) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना भारतीय रासायनिक परिषदे (ICC) 2022 चा प्रतिष्ठित आयसीसी डी. एम. त्रिवेदी जीवनगौरव पुरस्कार (D. M. Trivedi Lifetime Achievement Award) प्रदान करण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांच्या भारतीय रसायन उद्योगातील (शिक्षण आणि संशोधन) उल्लेखनीय योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.

 

ICC ही भारतीय रासायनिक उद्योगाची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. डॉ. अमोल कुलकर्णी 2005 पासून CSIR-NCL च्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात कार्यरत आहेत. ते रासायनिक अभियंता आहेत. त्यांनी जर्मनी व अमेरिकेतही उच्च शिक्षण व संशोधन केले आहे.

JRF, SRF आणि रिसर्च असोसिएट्स स्टायपेंडमध्ये वाढ ; शिक्षण मंत्रालयाने केले ट्विट

डॉ. कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना अनेक मान्यवर संस्थांनी मान्यता दिली आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची फेलोशिप (2021), अभियांत्रिकी विज्ञानातील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (2020), औद्योगिक क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी वास्विक पुरस्कार संशोधन (2016), भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे स्वर्णजयंती फेलोशिप (2015), एनसीएल रिसर्च फाउंडेशनचा CIPLA-हमीद प्रक्रिया विकास पुरस्कार (2019, 2023), यंग सायंटिस्ट पुरस्कार (इंडियन नॅशनल सायन्स अकादमी) 2009 आदींचा समावेश आहे.

 

त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल अकादमी ऑफ अभियांत्रिकी 2009, CSIR 2011, इंडियन एकेडमी ऑफ सायन्सेस 2011 आणि ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स ऑफ इंडिया 2015) आदीं पुरस्कारांचाही समावेश आहे. ते हम्बोल्ट फाउंडेशन (बॉन, जर्मनी) आणि फ्लँडर्स फाउंडेशन एफडब्ल्यूओ (ब्रसेल्स, बेल्जियम) च्या निवड समितीवर देखील काम करतात.

 

डॉ. कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय समीक्षक-पुनरावलोकन जर्नल्समध्ये 115 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, 10 पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून सध्या आठ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. 35 हून अधिक पेटंट दाखल केले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k