CA परीक्षेसाठीचे दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार 

उमेदवार येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10 ते 29 मार्च रात्री 11:59 या वेळेत बदल करू शकतात.

CA परीक्षेसाठीचे दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे.  ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार  27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यमात बदल करू शकतील.
" मे 2024 च्या CA परीक्षांसाठी आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी, परीक्षा शहर, गट आणि माध्यम बदलण्यासाठी ऑनलाइन विनंती पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असे  ICAI कडून सांगण्यात आले आहे. 

नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, सीए इंटरमिजिएट आणि फायनल मे परीक्षा उमेदवार ज्यांना परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम बदलायचे आहेत. ते उमेदवार येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10 ते 29 मार्च रात्री 11:59 या वेळेत बदल करू शकतात.

दरम्यान, लोकसभा 2024 निवडणुकांच्या घोषणेनंतर, ICAI ने CA फायनल आणि इंटरमीडिएट मे 2024 च्या डेट शीटमध्ये सुधारणा केली होती. सुधारित वेळापत्रकानुसार, इंटरमिजिएट ग्रुप 1 च्या परीक्षा 7 मे ऐवजी 3, 5 आणि 9 मे रोजी आणि ग्रुप 2 च्या परीक्षा 9, 11 आणि 13 मे ऐवजी 11, 15 आणि 17 मे रोजी होतील. 1 6 मे ऐवजी 2, 4 आणि 8 मे रोजी होणार आहे. सीए फायनल ग्रुप 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे ऐवजी 10, 14 आणि 16 मे रोजी होणार आहे.