NCET 2024 : 'तांत्रिक समस्यां'मुळे  NTA ने परीक्षा पुढे ढकलली

NCET परीक्षेसाठी नवीन तारीख अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in वर अपडेट केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

NCET 2024 : 'तांत्रिक समस्यां'मुळे  NTA ने परीक्षा पुढे ढकलली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने  नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (NCET) २०२४ ही परीक्षा  पुढे ढकलली (Exam postponed) आहे. ही परीक्षा काही तांत्रिक समस्यांमुळे (Technical problems) पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती 'एनटीए'ने दिली आहे. NCET परीक्षेसाठी नवीन तारीख अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in वर अपडेट केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. अचानक उद्भवणाऱ्या या समस्येमुळे परीक्षा केंद्रावर काही वेळासाठी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. 

ही परीक्षा काही केंद्रांवर सुरू झाल्यानंतर पुढे ढकलण्यात आली. NTA चा दावा आहे की एकूण 66 विषय असल्याने, अपलोड करण्यासाठी खूप प्रश्नपत्रिका होत्या आणि त्या प्रक्रियेत आम्हाला काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. तंत्रज्ञांच्या त्वरीत लक्षात आले की काही केंद्रांसाठी प्रश्नपत्रिका अपलोड होत नाहीत, म्हणून आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असे, एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

यावर्षी, एनसीईटी 2024 साठी 40 हजार 233 उमेदवारांनी नोंदणी केली. बायोमेट्रिक नोंदणी डेटानुसार, देशभरातील सुमारे 160 शहरांमध्ये असलेल्या 292 केंद्रांवर सुमारे 29, हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. NCET परीक्षेसाठी नवीन तारीख अधिकृत वेबसाइट ncet.samarth.ac.in वर अपडेट केले जाईल, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे. 

सत्र 2024-25 साठी IITs, NITs, RIEs आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय/राज्य विद्यापीठे/संस्थांमधील 4-वर्षीय एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (ITEP) प्रवेशासाठी डिझाइन केले आहे. यात एकूण 66 विषयांचा समावेश आहे. यामध्ये 38 भाषा, 26 डोमेन विषय, एक सामान्य चाचणी आणि एक टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट यांचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवाराला 2 भाषा, 3 डोमेन विषय, 1 सामान्य चाचणी आणि 1 अध्यापन अभियोग्यता चाचणी यासह एकूण 7 विषय देणे आवश्यक आहेत.