अभाविपचे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या इलाजासाठी 'व्हीलचेअर आंदोलन '

परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.परंतु, तरीही परीक्षा विभागाच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे अभाविपतर्फे परीक्षा विभागाविरोधात आंदोलन करण्यात आले.

 परीक्षा झाल्यानंतर नियमानुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, हा कालावधी उलटून गेला तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने (savitribai phule pune University exam department) विविध परीक्षांचे निकाल (result) जाहीर केले नाहीत. या गोष्टीचे गांभीर्य आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे (student)भवितव्य लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रतिकात्मक 'व्हिलचेअर आंदोलन' (wheelchair protest)केले.तसेच विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अशी मागणी केली. (For Latest education news ; मराठी शिक्षण बातम्या: eduvarta.com वर वाचा)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराचे वाभाडे नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील अधिसभा सदस्यांनी काढले होते.परीक्षा विभागात सुरू असलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.परंतु, तरीही परीक्षा विभागाच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे अभाविपतर्फे परीक्षा विभागाविरोधात आंदोलन करण्यात आले.

   आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.महेश काकडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून सर्व ‌निकाल लवकर जाहीर केले जातील,असे आश्वासन दिले. तसेच या निकालाच्या दिरंगाईत ज्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि दोषी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केली. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.