आई बहिणी वरून शिव्या का देता ? हा तर शाब्दिक बलात्कार : व्यवस्थापन सदस्य बागेश्री मंठाळकर यांचे मत

दोघांना ही आईबहिणी वरून शिवी दिली तर अजून राग येतो तर मग कोणी तरी थांबा ना . आम्ही बायकांनी आया बहिणींनी काय घोडं मारलयं तुमचं.

आई बहिणी वरून शिव्या का देता ? हा तर शाब्दिक बलात्कार : व्यवस्थापन सदस्य बागेश्री मंठाळकर यांचे मत

दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या rapsong चा video youtube वर प्रसारित झाला. त्या वरून प्रचंड वादळ उठलं आहे. तसेच त्यानिमित्ताने अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक परंपरा असलेल्या वास्तू मध्ये अशा प्रकारच्या अश्लील भाषेतील video कसा काय तयार केला गेला.

पोलीस complaint  झाली आहे. यामध्ये हे shooting परवानगीने केले की विनापरवानगी केले गेले, परवानगी दिली असेल तर ती कोणी दिली, shooting च्या दरम्यान दारूचा बाटल्या, बंदुका, तलवारी वापरल्या गेल्या, हा दहशत पसरवण्याचा प्रकार आहे की केवळ फॅड म्हणून केले गेले. हे सर्व बाहेर येईलच. पण यानिमित्ताने एक विचार वारंवार मनात येत आहे.

आपल्या समाजात स्वतःचं म्हणणं पटवून देणं, स्वतः चं वर्चस्व प्रस्थापित करणं, कोणाला dominate करणं, आपला राग, अस्वस्थता व्यक्त करणं, असंतोष जाहीर कारणं हे सगळं करताना बायकांवर "शाब्दिक बलात्कार" करण्याची काय गरज आहे?, दोन पुरुषांची, मुलांची आणि कधी कधी बायकांची ही भांडणं होतात तेंव्हा सर्रास बायकांचा आणि विशेषतः आई आणि बहिणीच्या अवयवांचा उद्धार केला जातो. त्या दोन भांडणाऱ्या व्यक्तींच्या  बिचाऱ्या आई, बहीण या कशातच नसतात. पण त्याचा इतका घाणेरडा उल्लेख करून त्यांना अप्रत्यक्षपणे निर्वस्त्र केलं जातं.

आपल्या समाजात कुठून आणि कशी ही पद्धत सुरू झाली. मुळात शिव्या देण्याची गरज आहे का ? आपले म्हणणे शिव्या न देता ही मांडता येत नाही का?. बरं मग "तुझ्या आईची ***, बेहेन, आय***" या सगळ्या जागी वडील किंवा भाऊ यांचा उल्लेख का करत नाही. ज्यांचा या सगळ्या विषयाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो त्या आया-बहिणींना विनाकारण कशाला रस्त्यावर उघडं करतात. हेच आपले संस्कार आहेत का ? अनेक पालकही आपल्या मुलांना यांचा जाब विचारात नाहीत. हे त्यातून वाईट.

बरं दोघांना ही आईबहिणी वरून शिवी दिली तर अजून राग येतो तर मग कोणी तरी थांबा ना . आम्ही बायकांनी आया बहिणींनी काय घोडं मारलयं तुमचं.

आई म्हणून नऊ महिने आणि पुढे अख्खं आयुष्य तुम्हाला सांभाळलं, बहीण म्हणून तुमच्यावर प्रेम केलं याचं हे फळ देता का?

कधी तरी याचा विचार केला पाहिजे ना. रोज रोज रस्त्यावर आया बहिणीचा होणार हा उद्धार आणि शाब्दिक बलात्कार थांबलाच पाहिजे !

- बागेश्री मंठाळकर , व्यवस्थापन सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे