विद्यार्थ्यांनो, चंद्रयान ३ प्रश्नमंजुषा स्पर्धेची तयारी सुरू केली का? या प्रश्नांची उत्तरे यायलाच हवीत...

भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट रोजी उतरले. आता दरवर्षी या दिवसाला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल,  तसेच चंद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण शिव-शक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल.

विद्यार्थ्यांनो, चंद्रयान ३ प्रश्नमंजुषा स्पर्धेची तयारी सुरू केली का? या प्रश्नांची उत्तरे यायलाच हवीत...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख काय आहे, रोव्हरचे  नाव काय आहे,  चंद्रयान ३ मोहिमेशी निगडित अशा अनेक प्रश्नांची प्रशमंजुषा स्पर्धा (Quiz Competition) लवकरच देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच देशभरातील विद्यार्थ्यांसाठी (Students) या स्पर्धेची घोषणा केली आहे. MyGov पोर्टल वर १ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. पंतप्रधानांनी देशभरातील विद्यार्थ्यांना या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बेंगलुरू येथे इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांची पंतप्रधानांनी भेट घेतली, यावेळी त्यांनी या स्पर्धेची घोषणा केली. भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट रोजी उतरले. आता दरवर्षी या दिवसाला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल,  तसेच चंद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण शिव-शक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल. चंद्रावरील ज्या जागेवर चंद्रयान-२ ने आपल्या पावलांचे ठसे सोडले होते त्याला ‘तिरंगा’ असे नाव देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

आता सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य-L1' झेपावणार; पुण्यातील 'आयुका'ची मोठी भूमिका

पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणांसह चंद्रयान मोहिमेविषयी विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती हवीत. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला याठिकाणी काही प्रश्न देत असून त्याची तयारी तुम्ही करू शकता. या स्पर्धेत तुम्हाला यश मिळवायचे असेल तर या प्रश्नांची तयारी नक्की करा.

हे असतील प्रश्नमंजुषेतील संभाव्य प्रश्न

* चंद्रयान ३ चंद्राकडे कधी झेपावले?

* चंद्रयान ३ चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग कधी झाले?

* चंद्रावर उतरलेल्या लँडर आणि रोव्हरचे नाव काय आहे?

* चंद्रयान ३ मोहिम कोणत्या संस्थेने आखली आहे?

* इस्त्रो या संस्थेचे संचालक कोण आहेत?

* चंद्रावर ज्या ठिकाणी लँडिंग झाले त्याला काय नाव दिले आहे?

* लँडर आणि रोव्हरचे मिशन लाइफ किती दिवसाचे असेल?

* चंद्रयान-३ साठी कोणते लाँचर वापरले गेले आहे?

* चंद्रयान-३  मोहिमेची उद्दिष्टे काय आहेत?

* चंद्रयान ३ मोहिमेसाठी किती खर्च आला?

* चंद्रयान ३ चे एकूण वजन किती आहे?

* चंद्रयान ३ चंद्रावर कुठे उतरले?

* चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा चौथा देश कोणता?

*  चंद्रयान-३ मोहिमेसाठी किती खर्च आला?

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo