अनुदान मंजूर शिक्षकांचे वेतन रखडकले: संघटनेचा आंदोलनाचा इशारा 

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना २० टक्के अनुदान देण्याचे आदेश जानेवारी महिन्यात आले आहेत. त्यानंतर सर्व शाळांची आणि पात्र शिक्षकांची पडताळणी झाली.पण अद्याप त्यांना अनुदान मिळाले नाही.

अनुदान मंजूर शिक्षकांचे वेतन रखडकले: संघटनेचा आंदोलनाचा इशारा 

खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना (Private Granted  school teacher ) जानेवारी महिन्यातच २० टक्के अनुदान मंजूर झाले, पण अद्याप पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) त्या आदेशाची अमलबजावणी झालेली नाही. त्या शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर अदा करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल,असा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी शिक्षक व शिक्षकेतर संघटनने दिला आहे. 
     प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे  म्हणाले, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना २० टक्के अनुदान देण्याचे आदेश जानेवारी महिन्यात आले आहेत. त्यानंतर सर्व शाळांची आणि पात्र शिक्षकांची पडताळणी झाली.पण अद्याप त्यांना अनुदान मिळाले नाही. मार्च महिन्यात  त्यांना हे अनुदान मिळणे  अपेक्षित होते.पुणे महानगरपालिका प्रशासनाने आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या २० टक्के अनुदानाची  ऑर्डर  लवकर काढावी यासाठी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी मिनाक्षी राऊत यांच्याकडे अर्ज  केला आहे. येत्या ३१ मे  पर्यंत आदेश निघतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.मात्र, तसे झाले नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत.  
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी शिक्षक व शिक्षकेतर संघटनने पालीकेतील अधिका-यांची  भेट घेतली.यावेळी संघटनेचे सचिव जितेंद्र पायगुडे, उपाध्यक्ष शशिकांत किंन्दे, महिला अध्यक्षा रसिका परब आदी उपस्थित होते.