पीजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्टीसह वर्षभरात मिळणार २० सीएल

नव्या नियमानुसार आता वैद्यकीय विद्यार्थ्यांना पूर्णवेळ निवासी डॉक्टरांप्रमाणे काम करावे लागणार आहे.

पीजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्टीसह वर्षभरात मिळणार २० सीएल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 

नॅशनल मेडिकल कौन्सीलने (National Medical Council) वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी (Postgraduate students in medical courses) मोठा निर्णय घेतला आहे. पीजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आणखी सुट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत साप्ताहिक सुट्टीसह त्यांना वर्षभरात २० सीएल म्हणजेच प्रासंगिक रजा देखील मिळेल. या शिवाय पाच दिवसांची शैक्षणिक रजाही मिळणार आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या १५ तक्रारींचे होणार निवारण ; लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

एनएमसीने हा निर्णय पीजी विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. नव्या नियमानुसार आता वैद्यकीय विद्यार्थ्यांना पूर्णवेळ निवासी डॉक्टरांप्रमाणे काम करावे लागणार आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या काळात विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात तीन महिने काम करणे बांधणकार करण्यात आले आहे.

 नव्या निर्णयांमुळे  विद्यार्थ्यांना दिवसभर विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार आहे. विश्रांतीसाठी वेळ मिळणार असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना नवीन उर्जेने काम करू करता येईल, असे NMC कडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र,  यावेळीही गॅझेटमध्ये या संदर्भात विशेष माहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांना 'वाजवी कामाचे तास' दिले जातील आणि त्यांना विश्रांतीसाठी पूर्ण वेळही मिळेल, असे NMC ने म्हटले आहे.