CBSE च्या शाळांमध्ये आता आपत्ती व्यवस्थापनचे धडे 

इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवला जाईल.

CBSE च्या शाळांमध्ये आता  आपत्ती व्यवस्थापनचे धडे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) कडून येत्या शैक्षणिक वर्षात बरेच महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याचच एक भाग म्हणून CBSE  शी संलग्न शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक विषयात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम (Disaster management lessons) शिकवला जाईल. विद्यार्थ्यांना आपत्तींची संकल्पना, त्यांची कारणे आणि  उपाय आदी बाबी शिकवण्यात येणार आहेत.

विद्यार्थी हे आपत्ती विषयानुसार शिकतील. सीबीएसई संलग्न शाळांसाठी निर्धारित केलेल्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा अभ्यासक्रम वर्गवार आणि विषयनिहाय शिकवण्यात यावा, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विषय शिक्षकांद्वारे वर्गांमध्ये आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत जनजागृती केली जाईल. हे धडे आपत्ती जोखीम कमी करण्याच्या विषयांशी जोडण्यासाठी आहेत.  इयत्ता सहावी ते दहावीच्या पाच मुख्य विषयांमध्ये (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान) त्यांचा समाविष्ट केले जाणार आहेत. 

हेही वाचा : CBSE दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

आपत्ती व्यवस्थापन हा अनेक वर्षांपासून CBSE अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, परंतु काळाची गरज लक्षात घेऊन, आपत्ती जोखीम कमी करण्याची  नवीनतम संकल्पना (DRR) अभ्यासक्रम आता सर्व विषयांमध्ये समविष्ठ करण्यात आला आहे.