आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नियमांमध्ये अमेरिकेकडून मोठे बदल 

व्हिसासंदर्भातील अमेरिकेचे धोरण विद्यार्थ्यांच्या त्यांच्या यूएसमध्ये राहण्याच्या कालावधीत वाढ, तसेच F आणि M श्रेणीतील विद्यार्थ्यांची स्थिती रिस्टोअर करण्यासाठीच्या अर्जांशी संबंधित आहे.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नियमांमध्ये अमेरिकेकडून मोठे बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून अमेरिकेने  व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल (Major changes in US visa rules) केले आहेत. भारतातून अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या बदलांचा भारतीय विद्यार्थ्यांवर थेट परिणाम (Direct impact on Indian students)होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे बदल F आणि M श्रेणीतील व्हिसा (F and M category visas)धारकांसाठी करण्यात आले आहेत.

यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने अमेरिकन शैक्षणिक संस्थांमधील अभ्यास आणि रोजगार श्रेणीमध्ये स्थलांतरित व्हिसासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.व्हिसासंदर्भातील अमेरिकेचे धोरण विद्यार्थ्यांच्या त्यांच्या यूएसमध्ये राहण्याच्या कालावधीत वाढ, तसेच F आणि M श्रेणीतील विद्यार्थ्यांची स्थिती रिस्टोअर करण्यासाठीच्या अर्जांशी संबंधित आहे.अमेरिकेत व्यावसायिक अभ्यासासाठी M व्हिसा दिला जातो, तर F व्हिसा सामान्य अभ्यासासाठी दिला जातो.

हेही वाचा : इंटेलिजन्स ब्युरोयामध्ये नोकरीची संधी ; भरती प्रक्रिया सुरू

अर्जदारांना अमेरिकेतील कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील अभ्यासानुसार, F किंवा M व्हिसा दिला जातो. दोन्ही प्रकारच्या व्हिसाच्या अंतर्गत, एखाद्याला 60 महिने अमेरिकेत राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते.नवीन बदलांनुसार F आणि M व्हिसाधारक तात्पुरत्या कालावधीनंतरही अमेरिकेत त्यांच्या इच्छेनुसार राहू शकतात, असं या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पदवीधर विद्यार्थी आता सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी 36 महिन्यांचे वैकल्पिक व्यावहारिक प्रशिक्षण घेऊ शकतात. तसेच एफ व्हिसा असलेले विद्यार्थी विज्ञान, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्सच्या पदवीच्या आधारे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतात.नवी नियमावली  २० डिसेंबर रोजी जारी करण्यात आली आहेत.