कंपनी सेक्रेटरी कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; येत्या १ ते १० जूनला परीक्षा

  ICSI CS  परीक्षा येत्या १ जून ते १० जून या कालावधीत होणार आहे.  

कंपनी सेक्रेटरी कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षेचे  वेळापत्रक जाहीर ; येत्या १ ते १० जूनला परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दी इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI- CS) जून २०२४ च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कार्यकारी कार्यक्रम अभ्यासक्रम-२०१७ आणि अभ्यासक्रम-२०१२ अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक कार्यक्रम अभ्यासक्रम-२०१७ आणि अभ्यासक्रम- यासाठी जून २०२४ सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

  ICSI CS  परीक्षा येत्या १ जून ते १० जून या कालावधीत होणार आहे.  CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम सिलॅबस-2017 च्या परीक्षा 1 ते 8  जून या कालावधीत घेतल्या जातील, तर एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम-2022 च्या परीक्षा एक दिवस आधी म्हणजे 7   जून रोजी संपतील. त्याचप्रमाणे सीएस प्रोफेशनल अभ्यासक्रम-2017 च्या परीक्षा १० जूनपर्यंत सुरू राहतील, तर  सीएस प्रोफेशनल अभ्यासक्रम-2022 च्या परीक्षा 7  जूनला संपतील.  एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रामच्या विविध पेपर्सच्या परीक्षा नियोजित तारखांना सकाळी 9 ते दुपारी 12 .15  या वेळेत घेतल्या जातील.