इंटेलिजन्स ब्युरोयामध्ये नोकरीची संधी ; भरती प्रक्रिया सुरू 

इंटेलिजन्स ब्युरोयामध्ये नोकरीची संधी ; भरती प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये नोकरी करण्यास इच्छूक असणाऱ्यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे.  IB  ने भरतीची नवीन जाहिरात (New recruitment advertisement) नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात ग्रेड २ च्या 226 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना येत्या 12 जानेवारीपर्यंत  ऑनलाइन अर्ज करता येतील. आयबीच्या  mha.gov.in  या वेबसाइटवरून  उमेदवार अर्ज भरू शकतात.

गृह मंत्रालय (MHA) द्वारे ही भरती आयोजित केली जात आहे. IB मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) ग्रेड २ च्या २२६ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी  उमेदवारांकडे GATE २०२१, २०२२, २०२३ चे वैध स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात BE/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे. सर्वसाधारण OBC, EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क २०० रुपये आहे, तर SC, ST, OH आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. 


अर्ज करण्याची प्रक्रिया 

* प्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जावे 

* संबंधित रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा. 

* त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी जमा करा. 

* शेवटी अर्ज सबमिट करा