महाराष्ट्राचा डंका! सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालय संख्येत देशात राज्याला मानाचे स्थान

देशात सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची संसदेत माहिती

महाराष्ट्राचा डंका! सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालय संख्येत देशात राज्याला मानाचे स्थान

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत एक महत्त्वपुर्ण माहिती दिली. देशात सरकारी (Gov. Medical Collage) आणि खाजगी वैद्यकीय (Private Medical Collage) महाविद्यालयाच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक (Second rank of Maharashtra) लागतो. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या आकडेवारीनुसार राज्य आघाडीवर आहे असे देखील ते म्हणाले. तर देशात सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालय असणारे तामिळनाडू हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूत देशातील सर्वाधिक ३८ सरकारी महाविद्यालये असल्याने या राज्याला पहिले मानाचे स्थान मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य देखील कुठल्याच क्षेत्रात पिछाडीवर नाही. महाराष्ट्र ३२ महाविद्यालयांसह देशात दुसऱ्या क्रमाकांवर आाहे. तर २८ महाविद्यालयांसह तेलंगणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय सर्वाधिक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये देखील महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४६, महाराष्ट्र आणि तमिळनाडू ३६, आणि उत्तर प्रदेश २८ अशी ही चार आघाडीचे राज्य आहेत. 

पुढे बोलताना मंडविया म्हणाले, “सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली आणि नंतर एमबीबीएसच्या जागा वाढवल्या. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३८७ वरून ७०६ पर्यंत ८२टक्के वाढ झाली आहे. शिवाय, MBBS च्या जागा २०१४ पासून ५१,३४८ वरून २०२३ पर्यंत १,०८,९४० पर्यंत ११२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. PG च्या जागा २०१४ पासून ३१,१८५ वरून २०२३ पर्यंत ७०,६४५ पर्यंत वाढल्या आहेत. जिल्हा रुग्णालये श्रेणीसुधारित करून नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी केंद्र प्रायोजित योजना (CSS) ज्या अंतर्गत १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी १०८आधीच कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली."