कृषी प्रवेशात संभ्रम; पहिली निवड यादी जाहीर, तरीही नव्या बदलांबाबत अनिश्चितता

अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात. आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे.

कृषी प्रवेशात संभ्रम; पहिली निवड यादी जाहीर, तरीही नव्या बदलांबाबत अनिश्चितता
Agriculture Admission Procees

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Agriculture Admission : राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या (Agriculture College) नियमांमध्ये राज्य सरकारने (Maharashtra Government) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या बदलांनुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. पण चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील निवड यादी प्रसिध्द झाली तरी याबाबत अद्यापही संभ्रम असल्याचे चित्र आहे. या निर्णयाची अंमबजावणी यंदापासून होणार की नाही, याबाबत अधिकाऱ्यांकडूनच स्पष्टपणे सांगितले जात नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच दिवसांपुर्वी झालेल्या बैठकीत प्रवेश प्रक्रियेतील बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या सीईटी सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयनुसार पसंतीक्रम भरून घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिध्द केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात. आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ही फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर प्रवेशासाठी दुसरी निवड यादी प्रसिध्द केली जाईल. विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांची या फेरीसाठी निवड केली जाईल. पण नवीन बदल लागू झाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठीही महाविद्यालयांतील रिक्त जागांनुसार नव्याने पसंतीक्रम नोंदविता येऊ शकतात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. 

असा आहे नवीन बदल

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होईल तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होईल. या निर्णयाची अंमलबजावणी याच वर्षीपासून करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आता पहिली निवड यादी प्रसिध्द झाली तरी त्यावर शिक्कामोर्तब न झाल्याने विद्यार्थ्यांमध्य संभ्रम वाढला आहे. दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविता येणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD