सोळ्या वर्षाखालील कोचिंगची अट तात्काळ मागे घेण्याची 'सीसीटीएफएम'ची मागणी 

नियमावलीला आमचा विरोध नसून त्यामध्ये घालून दिलेल्या जाचक अटींना आमचा विरोध आहे.

सोळ्या वर्षाखालील कोचिंगची अट तात्काळ मागे घेण्याची 'सीसीटीएफएम'ची मागणी 

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थांचा पाया ज्या वयोगटात भक्कम होतो त्या वयोगटातीलच सोळा वर्षाच्या (Sixteen years old) आतील विद्यार्थ्यांना यापुढे कोचिंग (Coaching classes) लावता येणार नाहीत, अशा अटी घालणाऱ्या काही गाईडलाईन्स केंद्र सरकारने (Central Govt. Guidelines) राज्य शासनाला सादर केल्या आहेत. यातील काही जाचक अटी तात्काळ मागे घ्याव्यात, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड शोशल फोरम ऑफ महाराष्ट्र (CCTFM) या राज्यव्यापी कोचिंगक्लासेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बंडोपंत भुसार (Bandopant Bhusar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारला केली आहे.  

 वर्धा येथे सीसीटीएफएम या संघटनेची राज्यव्यापी बैठक संपन्न या बैठकीमध्ये राज्यातील ३३ आदर्श शिक्षकांना पुरस्कारने सुद्ध वितरण करण्यात आले.तसेच शासाच्या नवीन नियमावलीच्या संदर्भात तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात राज्यभरातून आलेल्या कोर कमिटीच्या सदस्यांमध्ये विचार मंथन करण्यात आले. 

देशातील बिहार, राजस्थान, गोवा, कर्नाटक  या राज्यामध्ये ही नियमावली आधीच लागू करण्यात आली आहे. हाच प्रयत्न आता महाराष्ट्रात करण्यात येत आहे. अशा नियमावलीला आमचा विरोध नसून त्यामध्ये घालून दिलेल्या जाचक अटींना आमचा विरोध आहे. त्या सर्व अटी तात्काळ मागे घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संचालकांसाठी कोणतीही नियमावली ठरवताना संचालकांचे मत विचारात घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी संघटनेचे अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून कोचिंग क्लासेसचे संचालक, सदस्य व शिक्षक उपस्थित होते.