मोठी बातमी : पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती झाल्या प्रसिद्ध

पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहे. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा व मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील.

मोठी बातमी : पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती झाल्या प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज  नेटवर्क 


शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) शिक्षक भरतीसाठी (Teacher recruitment)पवित्र पोर्टलच्या (PAVITRA PORTAL) माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. लवकरच पसंतीक्रम नोंदवण्याची  संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिराती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहे. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा व मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत,याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली ; पवित्र पोर्टलवर 22 हजार जागांच्या जाहिराती सोमवारी होणार प्रसिद्ध

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युअलही प्रसिद्ध करण्यात येणार आहे,असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.