महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, 524 जागांसाठी जुलै महिन्यात होणार परीक्षा.. 

राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदांच्या एकूण 524 रिक्त जागांसाठी घेण्यात येणारी ६ जुलै रोजीची परीक्षा २१ जुलै रोजी होणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, 524 जागांसाठी जुलै महिन्यात होणार परीक्षा.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा (State Service Exam, Maharashtra Forest Service Exam, Maharashtra Civil Engineering Service Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगातर्फे एकूण 524 रिक्त जागांसाठी ही परीक्षा ६ जुलै रोजी घेतली जाणार होती. सुधारित तारखेनुसार आता ही परीक्षा २१ जुलै (Exam 21st July) रोजी घेण्यात येणार आहे. 

काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची (MPSC ExamMPSC Pre Exam) तारीख जाहीर करण्यात आली होती.  MPSC तर्फे येत्या 6 जुलै रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार होती, मात्र त्यामध्ये सुधारणा करुन आता ही परीक्षा २१ जुलै रोजी होईल. या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली असून एसईबीसी (SEBC) उमेवारांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.तसेच वयाधिक्यामुळे अर्ज करू  न शकलेल्या उमेदवारांना सुध्दा संधी दिली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता एकूण ५२४ रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. 

त्यानुसार शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभागाने अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) प्रवर्गातून अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ दिनांक ०६ जुलै, २०२४ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येईल, असे एमपीएससीने शुद्धीपत्राद्वारे स्पष्ट केले आहे.