CA इंटर, फायनल आणि INTT-AT परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 

देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे CA इंटर, फायनल आणि INTT-AT परीक्षाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

CA इंटर, फायनल आणि INTT-AT परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सीए फाउंडेशन (CA Foundation) आणि आंतरराष्ट्रीय कर - मुल्यांकन टेस्ट (INTT-AT) परीक्षा २०२४ (Intermediate Exam 2024) मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडियाने  (ICAI) देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे CA इंटर, फायनल आणि INTT-AT परीक्षाच्या तारखा बदलल्या (Exam date postponed) आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, CA इंटरमिजिएट  ग्रुप 1 ची परीक्षा  3, 5 आणि 9 मे 2024 रोजी घेतली जाणार आहे. तर ग्रुप 2 ची परीक्षा 11, 15 आणि 17 मे 2024 रोजी होणार आहे. सीए अंतिम ग्रुप 1 ची परीक्षा 2, 4 आणि 8 मे 2024 रोजी तर ग्रुप 2 ची परीक्षा 10, 14 आणि 16 मे 2024 रोजी होणार असल्याची माहिती ICAI  दिली आहे. 

ICAI कडून नवीन वेळापकत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये खुप मोठा असा बदल केला नसून काही तारखा जैसे तर काही तारखांमध्ये मागे पुढे करण्यात आले आहे. पुर्वीच्या वेळापत्रकानुसार CA इंटरमिजिएट ग्रुप 1 ची परीक्षा ICAI द्वारे 3, 5 आणि 7 मे 2024 रोजी घेतली जाणार होती आणि ग्रुप 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 मे 2024 रोजी होणार होती. तर सीए अंतिम गट 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे 2024 रोजी आणि गट 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे 2024 रोजी होणार होती. यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

https://eduvarta.com/Big-news-Postponement-of-CA-Inter-Final-and-Foundation-Exams

या शिवाय आंतरराष्ट्रीय कर - मूल्यांकन टेस्ट (INTT-AT) परीक्षा 14 आणि १६ मे रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकातील कोणत्याही दिवशी केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार/स्थानिक प्राधिकरणाद्वारे सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यास परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याने ICAI कडून नमुद करण्यात आले आहे. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.ical.org भेट द्यावी, असे सांगण्यात आले आहे.